Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेत वीज बिल, स्मार्ट मीटर सक्तीविरोधात महावितरणला निवेदन

 

भूमिगत वीज केबलसह विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वेतील वाढीव वीज बिल, स्मार्ट मीटरची सक्ती, भूमिगत वीज केबल आणि विजेसंदर्भातील इतर समस्यांबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महावितरणच्या टाटा पॉवर, मानपाडा रोड येथील कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. यावेळी नागरिकांच्या वीजविषयक तक्रारींकडे लक्ष वेधून त्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.


कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख नारायण पाटील,  शहर प्रमुख हेमंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकाऱ्यांची  भेट घेण्यात आली. कल्याण पूर्वेतील नागरिकांना वीज बिलांबाबत भेडसावणाऱ्या अडचणी, स्मार्ट मीटर बसविण्याबाबतची सक्ती, भूमिगत वीज केबलसंदर्भातील प्रश्न तसेच अन्य वीजविषयक तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
या वेळी उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवासेना आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.




Post a Comment

0 Comments