Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सिताराम रामा पाटील विद्यालयाचे सहशिक्षक सुनील म्हसकर यांची राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली (CCRT - Centre for Cultural Resources and Training) यांच्या तर्फे श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र सोसायटी पंजाबरी गुवाहाटी, आसाम येथे दिनांक ५ ते १४ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत'आपली सांस्कृतिक विविधता' या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील शिक्षक प्रशिक्षण संपन्न होत आहे. 

या प्रशिक्षणासाठी CCRT नवी दिल्ली तर्फे आणि SCERT - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे द्वारा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शेतकरी उन्नती मंडळाच्या सिताराम रामा पाटील विद्यालय आणि रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय आमणे, तालुका भिवंडी येथील सहशिक्षक सुनील मारुती म्हसकर सर यांची निवड करण्यात आलेली आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी आनंदाची असून सुनील म्हसकर सर यांचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. 

 सुनील म्हसकर सर हे एक आदर्श व उपक्रमशील शिक्षक असून याआधी त्यांची २००८ साली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षणासाठी राज्यातून निवड करण्यात आलेली होती. तसेच त्यांनी सन २००५ मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युवासंमेलनात महाराष्ट्र राज्याचे युवा प्रतिनिधित्व केले आहे. शैक्षणिक धोरण २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, (SCERT) पुणे तर्फे त्यांची २०२४-२०२५ या वर्षी इयत्ता ९वी व १०वी भाषा (मराठी) विषयासाठी त्तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली होती. तिथे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून आता राष्ट्रीय पातळीवरील शिक्षक प्रशिक्षणासाठी त्यांची राज्यातून निवड झाल्याने सुनील म्हसकर सर म्हणाले की,  "ही संधी मला मिळाली म्हणून आज मी खूप आनंदी आहे. आज माझी अवस्था 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी झालेली असून माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे!

आपल्या देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या ज्ञान व अनुभवसंपन्न अशा अभ्यासू शिक्षकांकडून आणि तज्ञ मार्गदर्शकांकडून या प्रशिक्षणातून मला निश्चितच नाविन्यपूर्ण असे अनमोल ज्ञान, अनुभव व विविध कौशल्य शिकण्यास मिळणार आहेत." 

ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबाबत पुढे ते म्हणाले की, "मी प्रथमतः CCRT चे सर्व संचालक व प्रशिक्षण समन्वयक शशांक कुमार  पांडे आणि SCERT चे विद्यमान संचालक डॉ. हेमंत वसेकर (IAS) साहेब, सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक श्री.अरुण जाधव,  DIET - ठाणे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे अधीक्षक डॉ. संजय वाघ साहेब, ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय देवीदास महाजन साहेब, शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री.राजू अनंत पाटील साहेब, पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी पूजा पिंगळे, सिताराम रामा पाटील विद्यालय आमणे, भिवंडी या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एकनाथ दळवी सर, रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय आमणे येथील इन्चार्ज श्रीमती सुरेखा भामरे या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. 

तसेच सदर प्रशिक्षणासाठी गुहावटी, आसाम येथे रेल्वे प्रवासाचे रिझर्वेशन कन्फर्म करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे व मुख्यमंत्री साहेबांचे कॅमेरामन श्री.प्रमोद इरमुलवार यांचे तसेच माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू - भगिनी आणि माझ्या म्हसकर परिवारातील सदस्य यांचे तसेच विशेष म्हणजे शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री.राजू अनंत पाटील साहेब हे सदैव माझ्या पाठीशी उभे राहून मला मार्गदर्शन व प्रेरणा देत असतात. यावेळीही त्यांनी मला या प्रशिक्षणासाठी परवानगी दिली म्हणून मी त्यांचा शतशः ऋणी असून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो."

सदर राष्ट्रीय पातळीवरील शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबाबत संपूर्ण राज्यातून सुनील म्हसकर सर यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे!

Post a Comment

0 Comments