Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खर्डी महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न



३० रक्तपिशव्यांचे संकलन

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी कल्याण येथील संकल्प रक्तपेढीचे सहकार्य लाभले. या उपक्रमातून एकूण ३० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

रक्तदान हे श्रेष्ठदान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. या उदात्त हेतूने रक्तदानाविषयी जनजागृती करणे आणि गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी हातभार लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र घोडविंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास कळकटे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल सोनावणे व प्रा. रसिका सकपाळ आणि स्वयंसेवक यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रक्तदानासाठी दाखविलेला उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद ठरला. 'रक्तदान करा... जीवन वाचवा...' हा सामाजिक संदेश देत महाविद्यालयाने सामाजिक आरोग्याप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.

Post a Comment

0 Comments