हल्लेखोरांना अटक करा........
अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
लोकल गाड्या उशिराने धावत असल्याचा राग कर्तव्यावर असलेल्या स्टेशन मास्तरांवर काढण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांवरील स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांच्या निषेधार्थ स्टेशन मास्तर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शेकडो स्टेशन मास्तरांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात शक्तिप्रदर्शन करत हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
यावेळी रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या जीआरपी कारवाईवर प्रश्न उपस्थित करत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली. संबंधित हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा स्टेशन मास्तर असोसिएशनने दिला आहे.
“लोकल उशिराने धावल्याचा राग स्टेशन मास्तरांवर काढला जातो. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होत असताना आरपीएफ आणि जीआरपी ठोस कारवाई कधी करणार? हल्लेखोरांना तातडीने अटक करून कायदेशीर शासन झाले नाही, तर आम्ही काम बंद करू,” असा इशारा स्टेशन मास्तर असोसिएशनचे कुमार कुंदन यांनी दिला.
.jpg)


Post a Comment
0 Comments