Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांचे निधन

वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...!
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ...!

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे विधानसभा प्रमुख तथा विजय नगर-गवळी नगर हौसिंग सोसायटी फेडरेशनचे संस्थापक प्रशांत काळे (वय ५५) यांचे मंगळवारी  सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने कल्याण पूर्व परिसरात शोककळा पसरली असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशांत काळे यांना वर्षभरापूर्वी ब्रेन स्ट्रोकचा गंभीर झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रशांत काळे हे शिवसेनेत विधानसभा प्रमुख म्हणून सक्रिय होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. विजय नगर-गवळी नगर हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. परिसरातील नागरिकांच्या समस्या, सोसायट्यांचे प्रश्न आणि स्थानिक विकासकामांसाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रशांत काळे यांच्या पश्चात पत्नी तथा प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका माधुरी काळे आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. सातारा येथील त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



Post a Comment

0 Comments