दुष्काळी भागात गरजू रुग्णांना
तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी
जनसेवेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शिवसेना वसमत तालुकाप्रमुख राजु चापके यांच्या पुढाकारातून तीन नवीन रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा डोंबिवली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
आरोग्यसेवा ही जनसेवेचा महत्त्वाचा भाग असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच सामाजिक बांधिलकीतून राजु चापके यांनी तीन नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे दुष्काळी भागात गरजू रुग्णांना तसेच संकटाच्या काळात मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, हिंगोली जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, आमदार सईद खान यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना वसमत तालुकाप्रमुख राजु चापके यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments