Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साप्ताहिक 'ब्लॅक अँड व्हाईट' तर्फे राज्यस्तरीय 'शिक्षक रत्न' पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

            ब्लॅक अँड व्हाईट ​डोंबिवली (विशेष प्रतिनिधी)

शिक्षक हे केवळ ज्ञानदानाचे कार्य करत नसून समाजाची आणि राष्ट्राची उभारणी करण्यात त्यांचे समर्पण व त्याग अनन्यसाधारण आहे, असे उद्गार विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी काढले. निमित्त होते साप्ताहिक ‘ब्लॅक अँड व्हाईट’ आणि ‘दैनिक ठाणे टाइम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तसेच कोकण विभाग पत्रकार संघ आणि श्वास फाऊंडेशन पुरस्कृत  करण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'शिक्षक रत्न' पुरस्कार वितरण सोहळ्याचे. डोंबिवली येथील गणेश मंदिर संस्थानच्या सभागृहात १० ऑक्टोबर रोजी हा नयनरम्य व प्रेरणादायी सोहळा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.ह्या शुभ प्रसंगी साप्ताहिक ब्लॅक अँड व्हाईटचा शिक्षक रत्न पुरस्कार विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.














​                मान्यवरांची विशेष उपस्थिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण, समाजकारण आणि क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिक्षण, उद्योग, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांची विशेष उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेता आणि उत्कृष्ट निवेदक  (क्राइम पेट्रोल फेम) सतिश नायकोडी यांनी नेहमी प्रमाणे ओघवत्या शैलीत आणि हसत खेळत केल्यामुळे,कार्यक्रम आणखीनच रंगतदार होत गेला.

​याप्रसंगी कोकण विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संजय हंडोरे पाटील, ठाणे टाइम्सचे प्रकाशक व संपादक श्री. रवींद्र खडपे, मेस्टाचे अध्यक्ष श्री. निलेश म्हात्रे, महाराष्ट्र कला सांस्कृतिक पर्यटन महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. अमित दुखंडे, माजी मुख्याध्यापिका व ज्येष्ठ वक्त्या सौ. दीपाली काळे तसेच मध्य रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा सौ. लता अरगडे,आणि डोंबिवलीतील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी श्री सुशील सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.











शिक्षकांच्या त्यागाचा आणि समर्पणाचा गौरव

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना प्रत्येक मान्यवराने शिक्षक या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या आधुनिक आणि वेगाने बदलणाऱ्या जगातही शिक्षकांचे स्थान किती मोलाचे आहे, हे सांगताना वक्त्यांनी शिक्षकांच्या अंगी असणारा त्याग आणि निष्ठेची प्रशंसा केली. भावी पिढी घडवताना शिक्षक देत असलेल्या योगदानाबद्दल पाहुण्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.

​











या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

















सोहळ्याच्या शेवटी पुरस्कारार्थी शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणाऱ्या अशा गुणगौरव सोहळ्यांमुळे काम करण्याची नवी ऊर्जा मिळते, अशा भावना व्यक्त करत शिक्षकांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. तसेच, अशा स्वरूपाचे प्रेरणादायी सोहळे दरवर्षी नियमितपणे आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आयोजकांना पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.​संपूर्ण सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.







Post a Comment

0 Comments