Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सुरेश वाडकर यांच्या सुरेल स्वरांनी डोंबिवलीकर रसिक मंत्रमुग्ध


ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
 सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायकीने डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात रंगत आणली. डोंबिवली पूर्वेतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात शुक्रवारी ही संगीत मैफल रंगली.


सुरेश वाडकर यांनी आपल्या सुमधुर आवाजातून लोकप्रिय गीतांसह भक्तिगीतांची सुरेल मेजवानी रसिकांना दिली. त्यांच्या भावपूर्ण गायकीला उपस्थित संगीतप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली. भक्तिमय वातावरणात रंगलेल्या या संगीत संध्येमुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून भक्ती, संगीत आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा संगम घडविण्यात येत आहे. सुरेश वाडकर यांच्या मैफलीने या सांस्कृतिक पर्वात विशेष रंगत आणली.


Post a Comment

0 Comments