दाक्षिणात्य कलाकारांच्या सादरीकरणाने
नवरात्रोत्सवात सांस्कृतिक वैभवाची भर
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने डोंबिवली पूर्वेतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर आयोजित शारदीय नवरात्रोत्सवात बंगळुरू येथील कलावंतांनी ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ हा विशेष नाट्याविष्कार सादर केला. देवीशक्तीचा महिमा आणि अधर्मावरील धर्माच्या विजयाचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पारंपरिक वेशभूषा, प्रभावी अभिनय, नृत्य आणि भक्तिभाव यांच्या सुरेख संगमातून कलावंतांनी महिषासुरमर्दिनीची पौराणिक कथा साकारली. या नाट्याविष्कारातून भारतीय संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळाली.
संस्कृती आणि परंपरांचे जतन करणाऱ्या अशा कलाविष्कारांना प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे आहे, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या सादरीकरणामुळे नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष रंगत आली.
.jpg)





Post a Comment
0 Comments