Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण ग्रामीणमध्ये रस्ते-पुलांच्या विकासकामांचा शुभारंभ


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 यांच्या सहकार्याने 

पिंपरी,नारीवली-वडवली आणि बाळेगावमध्ये कामांना सुरुवात

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रस्ते आणि पुलांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष सहकार्याने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.


पिंपरी येथे एमएमआरडीए योजनेतून गावांतर्गत रस्ता, तर नाबार्ड योजनेतून दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्यात येणार आहे. नारीवली ते वडवली रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून, तर या मार्गावरील लहान पुलाचे काम नाबार्ड योजनेतून करण्यात येणार आहे. बाळेगाव येथे एमएमआरडीए योजनेतून गावांतर्गत नवीन रस्ता, तर बाळेगाव कॅम्पमध्ये नाबार्ड योजनेतून नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामांमुळे गावांमधील संपर्क व्यवस्था सुधारण्यासह नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

बाळेगाव कॅम्प येथील कार्यक्रमाला एसीपी मुदगुन, एसीपी ठाकरे, एसीपी सोनवणे, एसआय शिंदे आणि पीएसआय मुठे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि मूलभूत सुविधांचा विकास करून कल्याण ग्रामीणच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.




Post a Comment

0 Comments