Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दीनिमित्त मुथा महाविद्यालयात विशेष व्याख्याने

 

पत्रकार किरण सोनवणे आणि अनिल बोरनारे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त कल्याण येथील शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे शुक्रवारी विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकार किरण सोनवणे आणि मुंबई-कोकण विभाग शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा, प्राचार्या अनुजा ब्रह्मे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. अजय पिल्ले, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.


महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याचा, शैक्षणिक योगदानाचा आणि स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा यावेळी आढावा घेण्यात आला. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि विषमता यांविरुद्ध लढा देत महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी केले.

पत्रकार किरण सोनवणे यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या समाजातील उपयुक्तता आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अनिल बोरनारे यांनी शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समता आणि महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यातून मिळणारी प्रेरणा यांवर आपले विचार मांडले.
या व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती मिळाली. तसेच सामाजिक बांधिलकी, समता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता भागवत यांनी केले.


Post a Comment

0 Comments