Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सेवा संकल्प अभियानांतर्गत महापालिकेमार्फत आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

 

नागरीकांनी  रक्तदानाकरीता, अवयव दानाकरीता इतरांनाही प्रेरित करावे ... ....आयुक्त अभिनव गोयल.

सेवा संकल्प अभियानांतर्गत आज महापालिकेने अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून या शिबीरात सहभागी होवून नागरीकांनी महापालिकेस सहकार्य करावे तसेच  रक्तदानासाठी आणि अवयव दानाकरिता  इतरांनाही प्रेरीत करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. 

नागरीकांना प्रशासनाच्या सेवा प्रभावीपणे देण्याकरीता "सेवा संकल्प "या अभियानांतर्गत महापालिकेने या रक्तदान शिबीरासह अनेक उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. या अभियानात स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, समुपदेशन शिबिर अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली.

या समयी शिक्षण समिती सभापती अभिजित थरवळ महिला बालकल्याण समितीच्या सभापती सारिका जाधव,इतर पालिका सदस्य/सदस्या, इतर मान्यवर,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त वंदना गुळवे,कांचन गायकवाड, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनीही यावेळी उस्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यांना यावेळी सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

त्याचप्रमाणे मान्यवरांना आरोग्य विषयक पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.या रक्तदान शिबिरात संकलित झालेले रक्त अर्पण थॅलेसेमिया सोसायटी द्वारे महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments