Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बल्याणीत अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची कारवाई

 

सहा खोल्या आणि पाच जोते जमीनदोस्त
                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘अ’ प्रभागात अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईला वेग आला आहे. सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी कारवाईची मोहीम सुरू केली असून, गुरुवारी बल्याणी परिसरातील पवारनगर येथे अनधिकृत बांधकामांवर पाडकामाची कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार आणि उपआयुक्त (अनधिकृत बांधकाम नियंत्रण) प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वडोदरा एक्स्प्रेस-वे जवळील पवारनगर परिसरात उभारण्यात आलेल्या सहा अनधिकृत खोल्या आणि पाच अनधिकृत जोत्यांचे बांधकाम पाडण्यात आले. 


यापूर्वीही ‘अ’ प्रभागातील आरक्षित भूखंडावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली होती. सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनधिकृत बांधकामांविरोधात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केल्याने परिसरातील अशा बांधकामांवर महापालिकेचे लक्ष राहणार असल्याचे चित्र आहे.
या कारवाईदरम्यान महापालिकेचे अनधिकृत बांधकाम पथक, पोलीस कर्मचारी आणि जेसीबी असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 


अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामधारकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी यापुढेही कारवाई सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






Post a Comment

0 Comments