सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत अंधश्रद्धेविरोधी रणशिंग
September 29, 2026
0
जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत यांनी परिषदेची प्रस्तावना केली. ‘बुवाबाजीचे वाढते प्रकार’ या सत्रात ॲड. रंजना गवांदे यांनी धर्माच्या आडून आधुनिक डिजिटल साधने व संकल्पनांचा वापर करून फसवणूक आणि शोषणाचे प्रकार होत असल्याचे सांगितले. यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड यांनी खगोलशास्त्र हे शास्त्र असून त्याचा आधार घेतलेले फलज्योतिष हे फसवे विज्ञान असल्याचे सांगत वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, कुंडली जुळवणे, कालसर्प योग आणि भविष्यकथन यांसारख्या प्रकारांवर भाष्य केले. प्रकाशन विभागाचे कार्यवाह मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी विविध तथाकथित चमत्कारांचे प्रयोग करून दाखवतानाच ‘माईंड रीडिंग’चे प्रात्यक्षिकही सादर केले.
Tags
.jpg)




Post a Comment
0 Comments