Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रस्त्यावर कचरा जाळल्याप्रकरणी केडीएमसीची कारवाई

 
    मिठाईच्या दुकानदाराला ५ हजारांचा दंड

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

रस्त्यावर कचरा जाळल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या जे प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने कारवाई करत संबंधित व्यावसायिकाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

जे प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत रस्त्यावर कचरा जाळला जात असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली. यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधितांवर कारवाई केली. या कारवाईत बालाजी स्वीट यांच्यावर रस्त्यावर कचरा जाळल्याबद्दल ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. कचरा जाळल्यामुळे परिसरात धूर निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास मनाई असल्याने महापालिकेने ही कारवाई केली.

दरम्यान, शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे अथवा जाळणे टाळावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.


Post a Comment

0 Comments