Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये 'एस. के. असाय अँड हॉलमार्क सेंटर'चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

 

                 ब्लॅक अँड व्हाईट ​कल्याण वार्ताहर 

ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार सोने-चांदीचे दागिने मिळावेत या उद्देशाने कल्याण (पश्चिम) येथे सरकारमान्य 'एस. के. असाय अँड हॉलमार्किंग सेंटर'चा भव्य उद्घाटन सोहळा आणि सत्यनारायण महापूजेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या सेंटरच्या माध्यमातून आता कल्याण व आसपासच्या परिसरातील सुवर्णकारांना आणि ग्राहकांना हॉलमार्किंगची विश्वासार्ह सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे.

​कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड, शिवाजी चौकाजवळ, नारायण वाडी येथील रावल निवास (पहिला मजला, शॉप नं. ८/०१) येथे हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायणाच्या महापूजेने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून सेंटरचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

​अखिल भारतीय व्यापारी असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य प्रभारी तथा सेंटरचे सीईओ मा. श्री. सुखदेव शेठ पडळकर (कुमारभाई) यांनी उपस्थितांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "सुवर्ण व्यवसायात पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. बीआयएस (BIS) मानकांनुसार शुद्धतेची खात्री देणारे हे सेंटर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांसाठी पथदर्शक ठरेल."


या सोहळ्याला परिसरातील अनेक व्यावसायिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालील मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


आयकर आयुक्त IRS मा. श्री. नितीन बानमोरे,

 IPS श्री बाळासाहेब पाटील,

श्री अतुल झेंडे  DCP कल्याण,

श्री रामदास कोकरे  - उपआयुक्त कडोंमपा, -

श्री अनिल यमगर -GST उपआयुक महाराष्ट्र,

श्री विजय मराठे  -ACP डोंबिवली,

श्री अशोक होनमाने  -ACP कल्याण,

श्री. विक्रम शिंगाडे साहेब -सभापती माण तालुका,

श्री. प्रकाश मुथा -प्रसिद्ध उद्‌योजक कल्याण,

श्री. मदन बल्लाळ  क्राईम ब्रांच आयुक ठाणे,

श्री. सुनिल कुराडे  ACP. पुणे,

श्री. अमरनाथ वाघमोडे  - PI रामनगर डोंबिवली,

 श्री. विजय अहिरे  - PI डोंबिवली,

श्री. सचिन लोखंडे  PI मानपाडा डोंबिवली 

श्री. शशिकांत कांबळे  - भाजपा गटनेता कडोंमपा

विजय यादव संपादक( ब्लॅक अँड व्हाईट )

विद्या कुलकर्णी कार्यकारी संपादिका  

सुशील सामंत लोकप्रतिनिधी

यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. सेंटरच्या सुरुवातीमुळे कल्याणमधील सुवर्ण व्यवसायाला एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला

Post a Comment

0 Comments