Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महादेवाच्या ध्यानमग्न गुहेतील बाप्पा - विजेती भक्तीमय संकल्पना सजावट

              ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली विद्या कुलकर्णी

डोंबिवलीतल्या रिजन्सी अनंतम बिल्डिंग नंबर १६/१४०५  सुवर्णा संदीप पाटील यांच्या घरात भगवान शिव आणि त्यांचे पुत्र गणेश यांच्यातील अतूट नाते सुंदर सजावटीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे .ही सजावट खूपच लोकप्रिय झाली आहे.महादेवाची ध्यानमग्न गुहा ज्यामध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत.त्यातील सजावट वाखाणण्याजोगी आहे.

ही संकल्पना साकारण्यासाठी त्यांना तब्बल १४-१५ दिवसाचा कालावधी लागला आहे. ही  संकल्पना पूर्णपणे हस्तनिर्मीत  आहे.असे सुवर्णा पाटील यांचे म्हणणे आहे. बाप्पाच्या आशीर्वादामुळे ही सजावट पूर्ण होऊ शकली असे  सुवर्णा पाटील यांचे मत आहे.या सजावटीलाABP maza news var  ‘सजावट तुमची बक्षिसे आमची’या अंतर्गत दैनिक घरगुती गणपती सजावट स्पर्धेसाठी २३ Sept २०२६ रोजी चे विजेते सर्वोत्कृष्ट दहा बाप्पा यात विजेतेपद पण मिळाले आहे. अजून एकदा उत्साह आणि कौतुकाचे क्षण जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल कडून प्राप्त झाला आहे.या सुंदर सजावटीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments