ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सद्या राज्यात गणेशोत्सवाच्या सुट्ट्या चालू असताना यू डायस प्लसचे काम पूर्ण करण्यासाठी १६ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आल्याने काम पूर्ण होणार नाही. याकरिता यू डायस चे काम पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी शिक्षण संचालकांकडे केली आहे.
संच मान्यतेसाठी स्टुडंट पोर्टलवरील आधार व्हेरीफाईड विद्यार्थी संख्याच ग्राह्य धरली जाते. अनेक विद्यार्थी शाळा बदलून गेलेले असतात. काही विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले मिळालेले नसतात तर काहींना यू डायस प्लस च्या ड्रॅाप बॅाक्समध्ये टाकलेले नसल्यामुळे नवीन शाळेत इम्पोर्ट करता येत नाहीं. त्यात राज्यात विशेषतः कोकण व मुंबईत गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी असल्यामुळे यू डायस अपडेट करून ड्रॅाप बॅाक्स निरंक करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी शिकतो नवीन शाळेत परंतु त्याचे नाव राहाते जुन्याच शाळेत. त्यामुळे संच मान्यता निश्चित होऊ शकत नाही.
विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याच शाळेतील यू डायस पल्सवर त्याचे नाव असायला हवे. ही ॲानलाईन कामे होताना अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. त्या दूर करून विद्यार्थी ज्या त्या शाळेतील यू डायस वर घेण्यास विलंब लागत असतो. त्याचप्रमाणे या वर्षी जनगणना व एसआयआर च्या कामांमध्ये शिक्षकांचे भरपूर दिवस शाळाबाह्य कामे करण्यात गेली. या अडचणी लक्षात घेऊन ड्रॅाप बॅाक्स क्लिअर करण्यास व शाळेत शिकक असलेले सर्व विद्यार्थी यू डायस प्लस मध्ये सहभागी करून घेण्यासाठी या महिना अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात मागणी शिक्षण क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments