Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शांतता विकास मंडळाचा ‘मराठी शाळा’ देखाव्यातून जनजागृतीचा संदेश

                    ​ब्लॅक अँड व्हाईट (मुंबई) वार्ताहर 

शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवात ‘मराठी शाळा’ ही सामाजिक संकल्पना साकारून मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व व आव्हानांकडे समाजाचे लक्ष वेधले आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर जनजागृती करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, याची प्रचिती यंदा शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यातून येत आहे. 


​या देखाव्यात फळा, सुविचार, वर्गखोल्या, संगणक कक्ष व मुख्याध्यापक कक्षाची हुबेहूब प्रतिकृती उभारून मराठी शाळेचा जिवंत अनुभव तयार करण्यात आला आहे. तसेच, मराठी भाषा व साहित्यात योगदान देणाऱ्या दिग्गज मान्यवरांचे स्मरण आणि शाळेतील विविध उपक्रमांची छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत.

​केवळ चित्रण न करता, मराठी शाळा बंद पडण्याची कारणे व त्या सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बदलते तंत्रज्ञान व आधुनिक शिक्षणाची जोड देऊन मराठी शाळा जपल्या पाहिजेत, असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नाला स्पर्श करणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी भेट देऊन मराठी शाळांच्या भवितव्याबाबत विचार करावा, तसेच या विषयावर सकारात्मक चर्चा घडून यावी, अशी अपेक्षा *शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने* व्यक्त केली आहे.


Post a Comment

0 Comments