Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कॅडेट धैर्य नाईकची Guinness World Record मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

भारतीय सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खडवली येथील कॅडेट धैर्य नाईक याने कराटे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या Largest Karate Display मध्ये सहभागी होत धैर्य नाईकच्या नावाची Guinness World Record मध्ये नोंद झाली.

जागतिक विक्रमाची नोंद झाल्यानंतरही धैर्यने आपल्या यशाची मालिका कायम ठेवत जयपूर येथे झालेल्या प्रतिष्ठित Maharana Pratap National Karate Championship मध्ये ५० किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. जागतिक विक्रम आणि राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक अशी दुहेरी कामगिरी करत त्याने आपल्या क्रीडाकौशल्याची, जिद्दीची आणि सातत्यपूर्ण मेहनतीची प्रभावी छाप उमटवली.

निवासी सैनिक शाळेतील विद्यार्थी म्हणून शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करण्याची परंपरा धैर्यने पुढे नेली आहे. नियमित सराव, शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

धैर्यच्या या यशामागे त्याची मेहनत आणि जिद्द यांसोबतच त्याचे प्रशिक्षक, पालक, शिक्षक,मुख्याध्यापक, कमांडंट,शालेय समिती अध्यक्षा राजेश्वरी मॅडम तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.अप्पासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. निवासी शाळेतील शिस्तबद्ध वातावरण, नियमित दिनक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध संधी यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा व इतर क्षेत्रांतही आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी योग्य वातावरण मिळत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या भारतीय सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खडवली येथे शैक्षणिक अभ्यासासोबतच क्रीडा, शारीरिक प्रशिक्षण, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाला विशेष महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी मिळावी, यासाठी संस्थाचालक, शालेय समिती अध्यक्षा, कमांडंट मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व प्रशिक्षक सातत्याने प्रयत्नशील आहेत.

धैर्य नाईकच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कमांडंट आदरणीय शंकर यादव, मुख्याध्यापक आदरणीय महेश भावसार, शालेय समिती अध्यक्षा आदरणीय राजेश्वरी शिंदे मॅडम आणि संस्थाचालक माननीय आप्पासाहेब शिंदे यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शिक्षकवृंद, प्रशिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही धैर्यच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. त्याच्या या कर्तृत्वामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, इतर विद्यार्थ्यांनाही आपल्या आवडीनिवडी आणि क्षमतांच्या क्षेत्रात मेहनत घेऊन पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.

शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, क्रीडा आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यांचा समन्वय साधणाऱ्या भारतीय सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खडवली,ता.कल्याण, जि.ठाणे येथे प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी शाळेशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments