Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केबल फॉल्ट मुळे काँक्रिट रस्ता फोडला


     

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये अनेक विकास कामे (काँक्रिट रस्ते, नाले/गटारी इत्यादी) झाली पण नियोजन नसल्याने त्याच्या फटका नागरिकांना, महावितरण इत्यादींना बसत आहे. अनेक ठिकाणी महावितरणला केबल फॉल्ट मुळे रस्ते तोडावे लागत आहेत

आज निवासी भागातील मिलापनगर तलाव रस्त्यावरील षटकार इमारती समोर RL - 40 येथे महावितरणच्या भूमिगत वाहिन्या मध्ये फॉल्ट निर्माण झाल्याने काही इमारती/बंगले यांच्या विज पुरवठा खंडित झाला होता. महावितरण कर्मचाऱ्यांनी याबाबत तपासणी केली असता काँक्रिट रस्त्याच्या खाली केबल फॉल्ट असल्याचे समजले. विज ग्राहकांना तातडीने विज पुरवठा चालू करण्यासाठी त्यांना हा काँक्रिट रस्ता तोडण्याशिवाय पर्याय नव्हता. काँक्रिट रस्ते आणि नाले, गटारी बनविताना विज, पाणी इत्यादी वाहिन्यांना धक्के बसल्याने केबल फॉल्ट होत आहेत.


Post a Comment

0 Comments