Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाणे जिल्ह्यात शिक्षक चर्चासत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

                      ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने CEQUE संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने दि. 18 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान शिक्षकांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चार दिवसीय चर्चासत्रामध्ये दोन दिवस भाषा व दोन दिवस गणित या विषयांवर शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन पद्धतींची ओळख करून देण्यात आली.

भाषा विषयाच्या सत्रामध्ये सार्थक वाचन व वाचनाचे टप्पे – वाचनपूर्व, वाचनादरम्यान आणि वाचनानंतर या संकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ व आनंददायी होणे तसेच विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी विविध कृती व नाविन्यपूर्ण पद्धती शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देण्यात आल्या.


गणित विषयाच्या सत्रामध्ये संख्याज्ञान व संख्यांवरील मूलभूत क्रिया या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये चौकटीचा कागद, संख्या रेषा, Number Bond यांसारख्या नाविन्यपूर्ण साधनांचा वापर करून गणितीय संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत अधिक सहज व परिणामकारक पद्धतीने कशा पोहोचवता येतील, यावर कृतीशील चर्चा करण्यात आली.या चर्चासत्रासाठी अपेक्षित असलेल्या सर्व शिक्षकांची 100% उपस्थिती राहिली. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, उत्साही आणि सहभागात्मक वातावरणात पार पडला. शिक्षकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली.

सीखे संस्थेचे प्रोग्राम लीड कॉसमॉस जोसेफ,भाषा विषयासाठी स्मिता ढगे मॅडम, अश्विनी भुणभुणे मॅडम, नम्रता कडव मॅडम आणि सोनाली लोखंडे मॅडम, तर गणित विषयासाठी आशिष केळशीकर सर, समीर वारणकर सर आणि अंजली रघुराम मॅडम यांनी विषयतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.तसेच सुदर्शना शिरोडे (सोनारपाडा, दहिसर), दीपक मुंगसे (गुरवली, खडवली), नंदू चौधरी (गोवेली, मामणोली) आणि हेमंतकुमार गिरी (खोणी, म्हारळ) या केंद्रप्रमुखांनी उपस्थित राहून शिक्षकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.


ठाणे जिल्ह्यात सुलभक जिल्हा समन्वयक अश्विनी पाटील, कोच उत्कर्षा पाटील,नरेश सोनवणे,योगिता रहाटे,रूपाली रणदिवे, ज्ञानेश्वर मेंगाळ,प्रज्ञा जगे यांनी सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन  सांभाळले.चर्चासत्रादरम्यान शिक्षकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य व इतर व्यवस्थापनाची संपूर्ण तयारी CEQUE संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. या चार दिवसीय चर्चासत्रामुळे शिक्षकांना भाषा व गणित विषयातील संकल्पना अधिक प्रभावी, कृतीशील आणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने शिकविण्यासाठी नवीन दृष्टिकोन मिळाल. शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे चर्चासत्र अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments