ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
टिटवाळा स्टेशन गणपती मंदिर रोड ते निमकर नाका रस्ता परिसरात अनाधिकृत फेरीवाले, ठेलेवाले, हातगाडी यांचा वावर यामुळे फुटपाथ देखील व्यापले आहेत. गर्दीच्या वेळेस होणारी वाहतूक कोंडी या दृष्टीकोनातून अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी चार्ज घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी थेट अनाधिकृत फेरीवाला हटाव मोहीम राबविली. अनाधिकृत ठेले,अनाधिकृत हातगाड्यावर थेट कारवाईचा बडगा उगारल्याने स्टेशन परिसरातील रस्त्याने मोकाळा श्वास घेतला असल्याचे चित्र दिसत होते.
अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी फेरीवाला हटाव पथकासबोत आँन फिल्ड जात थेट कारवाईचा बडगा उगारल्याने अनाधिकृत फेरीवाल्यांची पळताभुई थोडी झाल्याने त्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसत होते.
याबाबत अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्याशी संपर्क साधला असता स्टेशन परिसरात १५० मीटर अंतरावर फेरीवाला मुक्त परिसर असावा असे न्यालयाचे आदेश असून केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार, उपाआयुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनुसार अनाधिकृत फेरीवाला हटाव मोहीम राबविण्यात आली असल्याचे सांगितले. या अनाधिकृत फेरीवाला हटाव मोहीममध्ये फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी, टेम्पो असा फौजफाटा होता.
.jpg)





Post a Comment
0 Comments