Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये पुन्हा कुत्र्याची दहशत


                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर

कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात पाळीव कुत्र्याने एका चिमुकल्यावर केलेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साई शरण इमारतीत घडलेल्या या घटनेत कुत्र्याने चिमुकल्याच्या हाताचा जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात त्याच्या हाताला खोलवर जखम झाली असून, जखम एवढी गंभीर होती की हाताचे मांस बाहेर आले. हल्ल्याची संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला इमारतीच्या परिसरात असताना अचानक पाळीव कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या हाताला जोरदार चावा घेतल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले.


            चिमुकल्याच्या हाताचा खोलवर चावा

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

परिसरातील नागरिकांनी पाळीव कुत्रे पाळताना आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते का, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी संबंधितांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने समोर येत असताना प्रशासनाने केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


Post a Comment

0 Comments