Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेतील भानु ज्योत रुग्णालयात डॉक्टरला मारहाण


शास्त्रीनगर रुग्णालयातील घटनेनंतर पुन्हा

डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेतील नामांकित भानु ज्योत रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकाने डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांच्याशी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एक रुग्ण आपल्या नातेवाईकासोबत उपचारासाठी भानु ज्योत रुग्णालयात आला होता. डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्याच्या आजाराबाबत तसेच उपचारासंदर्भात समजावून सांगत असताना रुग्णासोबत आलेला नातेवाईक संतापला आणि डॉक्टरांशी वाद घालू लागला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून रुग्णाने आपल्या नातेवाईकाला डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर काढले. मात्र काही वेळाने तो पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments