ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून १६३ वर्ष अविरत वाचनसेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याणचे पदाधिकारी, ग्रंथपाल व ग्रंथसेविकांनी भेट देऊन भिवंडी येथील वाचन मंदिर(अ दर्जा) व आनगाव येथील जनता वाचनालय ( क दर्जा ) येथील ग्रंथपाल व ग्रंथसेविकांच्या कार्याला सलाम व वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याकरिता त्यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
अनेक आगळ्या - वेगळ्या उपक्रमांप्रमाणेच सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून ग्रंथालय चळवळीचा एक भाग म्हणून “ग्रंथालय ग्रंथपालांच्या भेटीला” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी वाचनसंस्कृती रुजविण्याबरोबर ती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथपाल व ग्रंथसेविकांचे योगदान अव्याहतपणे चालू आहे. म्हणूनच ग्रंथालयांचे महत्त्व आजही चिरकाल अबाधित आहे व पुढेही राहील हा विश्वास निर्माण करण्यासाठी ही आदर्श संकल्पना राबविण्याचा हा एकमेव विधायक हेतू असल्याचे प्रतिपादन बारस्कर यांनी केले.
त्याचप्रमाणे प्रसंगी भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ,ठाणे संचालित महिला आश्रमास वाचनालयाच्यावतीने पुस्तक भेट देण्यात आला. वाचनालयात डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर भिवंडी तालुक्यातील “राजा शिवछत्रपती” स्मारकाच्या परिसरात वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे व सह. ग्रंथपाल करुणा कल्याणकर व ग्रंथसेविकांना सन्मानित करण्यात आले.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पावन भूमीत सन्मान हा स्वप्नवत आहे. भूतो न भविष्यती असा अविस्मरणीय सन्मानाने भा रवून गेले असल्याचे मत सह ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमास ज्येष्ठ कवी संदीप कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रसंगी वाचनालयाचे खजिनदार दिलीप कर्डेकर, कार्यकारणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी,या मंगलप्रसंगी उपस्थित होते.
.jpg)





Post a Comment
0 Comments