“पालकांनी मुलांच्या कलागुणांना संधी द्यावी” — सुरेखा गावंडे
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पाली भाषा प्रचार व प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय, सम्राट अशोक हायस्कूल, सेंट वाय.सी. इंग्लिश स्कूल, विपश्यना बालविहार व सम्राट अशोक इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ बाल कवयित्री सुरेखा गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरेखा गावंडे म्हणाल्या, “आपण जात-धर्माचा भेद न करता देशाचा अभिमान बाळगला पाहिजे. शिक्षणाला जात-धर्माचे बंधन नसते. खरी श्रीमंती ही शिक्षणात आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आवडीनुसार शिक्षण घेण्याची संधी दिली पाहिजे.” आपल्या मार्गदर्शनाच्या शेवटी त्यांनी गाजर, मुळा, काकडी यावर आधारित बालकविता सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली
मराठी माध्यमातील विद्यार्थीही विविध क्षेत्रांत भरारी घेऊ शकतात, हे अधोरेखित करत शाळेचे माजी विद्यार्थी साईराम सावंत (सी.ए.), रीमा महाकाळ (वकील), तेजस्विनी रणवरे (डॉक्टर) आणि रोशनी राठोड (डॉक्टर) यांनी आपल्या क्षेत्रात नुकतेच पदार्पण केले त्यांचाही शाळेने सत्कार केला. विद्यार्थ्यांची परिसरात देशभक्तीपर घोषणा देत तिरंगा रॅली काढली. या रॅलीत विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केले सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले तर आभार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी मानले.
.jpg)



Post a Comment
0 Comments