" निंदकाचे घर असावे शेजारी "
मनसे नेते राजू पाटील यांना चव्हाण यांचा टोला
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचा ५१ वा वर्धापन दिन सोहळा तसेच खेळाडूंच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या वेदर शेडचा उद् घाटन सोहळा भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते पार पडला.
मनसे नेते राजू पाटील आणि भाजपा नेते यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू असून आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राजू पाटील यांचे नाव न घेता जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण आणि निंदकाचे घर असावे शेजारी असा टोला लगावला. तर मनसे नेते राजू पाटील आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची शोलेची मैत्री असून यामध्ये राजू पाटील यांनाच धोका असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने गेल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करत आहे. डोंबिवलीतील खेळाडूंच्या सोयीसाठी नेहरू मैदान येथे उभारण्यात आलेले हे वेदर शेड क्रीडा क्षेत्राला नवी चालना देणारे ठरेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
.jpg)



Post a Comment
0 Comments