ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज विविध ठिकाणी देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी सर्वप्रथम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर अॅड. हर्षाली चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह महानगरपालिका पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यानंतर डोंबिवली पूर्व येथील जुन्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातील उप महापौर राहुल दामले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी देखील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच कॅ. विनयकुमार सचान स्मारक आणि प्रेरणा वॉर मेमोरियल (शहीद स्मारक) येथे मान्यवरांच्या हस्ते पुष्प चक्र वाहून अभिवादन करण्यात आले.
.jpg)



Post a Comment
0 Comments