Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेला कल्याणचा तरुण बेपत्ता

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेला कल्याणचा २८ वर्षीय तरुण अभिषेक घोणे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात असून, त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील चार नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

अभिषेक घोणे हा मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे घोणे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अभिषेक सुखरूप असावा यासाठी कुटुंबीय त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.


अभिषेकचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्याबाबतची माहिती कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी घोणे कुटुंबीयांनी शासनाकडे केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने मदतकार्य करून बेपत्ता नागरिकांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments