ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
‘काव्य नृत्यम् २ – Celebrating the Lyrical Verses of J. K. Roseline’ या कार्यक्रमातून कवितेला संगीत, नृत्य, रंग आणि अभिनयाची सजीव अभिव्यक्ती मिळाली. २१ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) येथे हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
अभिनया इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड फाइन आर्ट्स, वसईच्या संस्थापक व गुरू डॉ. चित्रा विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर झाला. संस्थेच्या प्रशिक्षित युवा नृत्यांगनांनी आपल्या नृत्यरचनेतून जे. के. रोझलीन यांच्या कवितांना रंगमंचावर सजीव केले. विविध विषयांचा अर्थ आणि भावविश्व समजून घेत ते नृत्यातून व्यक्त करण्यासाठी कलाकारांनी उल्लेखनीय आत्मविश्वास आणि संवेदनशीलता दाखवली.
कार्यक्रमाची सुरुवात जे. के. रोझलीन यांच्या सुमारे १५ मिनिटांच्या परिचयपर निवेदनाने झाली. आपल्या साहित्यिक प्रवासाबद्दल, कवितांच्या प्रेरणेबद्दल तसेच त्यांच्या लेखनाला आकार देणारे विचार आणि अनुभव याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या निवेदनामुळे सादर होणाऱ्या कलाकृतींना त्यांच्या कवयित्री आणि लेखिका म्हणूनच्या प्रवासाची व्यापक पार्श्वभूमी मिळाली.
कार्यक्रमात एकूण दहा नृत्यरचना सादर करण्यात आल्या. ‘राणी दुर्गावती’ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर निसर्ग, भक्ती, देशभक्ती, इतिहास, शांतता, प्रेम, मानवी मूल्ये आणि जीवनातील विविध पैलू अशा अनेक विषयांचा प्रवास नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून उलगडत गेला.
या सर्व नृत्यरचना रोझलीन यांच्या तीन काव्यसंग्रहांमधील निवडक कवितांवर आधारित होत्या—A Bouquet of Roses, Nature Tales आणि The Guiding Lights. इतिहास आणि शौर्यापासून निसर्ग, देशप्रेम, शांतता, प्रेम आणि मानवी मूल्यांपर्यंत विविध भावविश्वाला अत्यंत
.jpg)





Post a Comment
0 Comments