३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा रॅलीतून नेण्याचा विश्वविक्रम
हजारो देशप्रेमी विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशप्रेम, राष्ट्राभिमान आणि सामाजिक एकतेच्या अभूतपूर्व सोहळ्यात रूपांतरित करत डोंबिवलीत १५ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक रॅलीत हजारो नागरिकांनी एकत्र येत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हातात घेऊन मार्गक्रमण केले. तर सुमारे १० हजार हुन अधिक विद्यार्थी आणि सुमारे १५ हजार नागरिक यांच्या सहभागातून हा तिरंगा रॅलीतून नेण्यात आला.
तर याची ' वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडीया, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. या भव्य उपक्रमातून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
.jpg)


















Post a Comment
0 Comments