Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महापालिकेच्या मोबाईल टॉवरची ₹६०० कोटींची थकबाकी वसुलीसाठी मंत्रालयात पाठपुरावा

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवरच्या माध्यमातून महापालिकेला मिळणे असलेली सुमारे ₹६०० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी तदर्थ समितीच्या वतीने मंत्रालयात महत्त्वपूर्ण पाठपुरावा करण्यात आला.

या संदर्भात तदर्थ समितीच्या सर्व  सदस्यांनी मंत्रालय येथे जाऊन महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाचे सचिव  वीरेंद्र सिंह यांची भेट घेण्यात आली. यावेळी मोबाईल टॉवरची प्रलंबित थकबाकी कोणत्या पद्धतीने कायदेशीर, प्रभावी आणि गतिमान पद्धतीने वसूल करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नासाठी मोबाईल टॉवरची थकबाकी वसूल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून या थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या वेळी तदर्थ समितीचे सदस्य  दिपेश म्हात्रे, निलेश शिंदे,  गणेश जाधव, सचिन पोटे, दर्शना काळे,  किरण भांगले, संदेश पाटील,  शशिकांत कांबळे, मंदार हळबे, खुशबू चौधरी, अमित धाकस,  उमेश बोरगांवकर आणि कांचन कुलकर्णी उपस्थित होते. तसेच ॲडिशनल कमिशनर  योगेश गोडसे आणि महापालिका सचिव यांचीही उपस्थिती होती.

महापालिकेच्या हक्काची मोबाईल टॉवरची थकबाकी वसूल करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी तदर्थ समितीचा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.

Post a Comment

0 Comments