ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली (विद्या कुलकर्णी )
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउनतर्फे डोंबिवली जिमखाना येथे “सुरक्षा बंधन २०२६” या अभिनव रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देशाच्या सीमा तसेच अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन व नागरी संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, RAF, NDRF, SDRF, पोलीस, CISF, अग्निशमन दल, सिव्हिल डिफेन्स व होमगार्ड यांच्या सुमारे ८५ प्रतिनिधींना एकत्र आणून कृतज्ञता व्यक्त करणे हा उपक्रमाचा उद्देश होता.
दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे पद्मश्री सन्मानित निवृत्त इंडियन नेव्ही अधिकारी श्री. गजानन माने यांनी उपक्रमाचे कौतुक करून राष्ट्रसेवेचा संदेश दिला. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन अध्यक्ष Rtn. Dr. किशोर अढळकर यांनी सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माजी राष्ट्रीय रायफल्स जवान श्री. नितीन मोरे यांनी जम्मू-काश्मीरमधील सेवाकाळातील अनुभव सांगितले. श्री. बिमल नथवानी, श्री. विजय जाधव, श्री. कमलेश श्रीवास्तव, श्री. यतीन तडवी, ACP सुहास हेमाडे व NDRFचे श्री. एस. एस. पात्रा यांची विशेष उपस्थिती लाभली.
रोटरी महिला सदस्यांनी वीरबंधूंचे औक्षण करून राखी बांधत त्यांना भेटवस्तू दिल्या. गायक अमोल मेनन यांच्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. रोटरी सदस्य, पत्रकार व के. एम. पटेल कॉलेजचे ३२ NSS विद्यार्थी यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली जोगळेकर आणि श्री. गणेश डोयफोडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमातील प्रत्येक टप्प्याची योग्य माहिती देत त्यांनी कार्यक्रमाची रंगत कायम ठेवली.
“राखीचा धागा केवळ बहीण-भावाला नाही, तर नागरिकांना राष्ट्ररक्षकांशीही जोडतो.” या भावनेतून “सुरक्षा बंधन २०२६” हा उपक्रम राष्ट्रसेवेला रक्षाबंधनाची अर्थपूर्ण जोड देणारा ठरला.
.jpg)








SUPAR NICE
ReplyDelete