Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत केडीएमसी अधिकारी आणि बिल्डरचा आणखी एक कारनामा

14 मजल्याची परवानगी      उभारली 21 मजली इमारत

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
केडीएमसी क्षेत्रातील  डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात धक्कादायक अनधिकृत बांधकामाचा प्रकार समोर आला आहे. 14 मजली इमारतीची परवानगी घेऊन तब्बल 21 मजले उभारण्यात आले असल्याची धक्कादाक माहिती  शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी त्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन संबंधित बिल्डर, आर्किटेक्ट आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्राप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इमारतीसाठी केवळ 14 मजल्यांची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यावर आणखी सात मजले अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही जागा संतोष भोईर आणि इतरांच्या मालकीची असून, नीता वैती या इमारतीच्या विकासक असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाबाबत विकास म्हात्रे यांनी केडीएमसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, संपूर्ण बांधकामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

65 अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच हा प्रकार समोर आल्याने केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बिल्डर आणि काही अधिकारी यांच्या संगनमतामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची तसेच शासनाची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.

"याबाबत केडीएमसीचे नगर रचनाकार संतोष डोईफोडे यांनी सांगितले की संबंधित इमारती प्रकरणात महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. सात मजले अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच एमआरटीपी अंतर्गत देखील कारवाई केली जाणार आहे."




Post a Comment

0 Comments