ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
विद्यार्थ्यांच्या लाठीचार्ज निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्या सुचनेनुसार आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या प्रमाणे वंचित बहुजन आघाडी कल्याण तालुका ग्रामीण उपाध्यक्ष सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली खडवली येथे मोर्चा काढण्यात आला. तर मोहने परिसरात कडकडीत बंद पुकारण्यात आला.
खडवली येथील मोर्चाला पश्चिमेतील साईबाबा मंदिर येथून सुरूवात करण्यात आली. मोर्चा मध्ये बहुजन समाज नागरिक व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच व्यापारी वर्ग व रिक्षा संघटना यांनी स्वताहून सहकार्य केले काही वेळेसाठी दुकाने व रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर कल्याणलगतच्या मोहने परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंदला प्रतिसाद मिळवण्यासाठी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली.
.jpg)


Post a Comment
0 Comments