ब्लॅक अँड व्हाईट विशेष
अनेक शासन व्यवस्था आहेत ; त्यात सर्वोत्तम म्हणुन सर्वानीच लोकशाहीला समजले आहे. आज लोकशाही जवळपास सर्वच राष्ट्रात कमी अधिक प्रमाणात आहे. काही ठराविक राष्ट्रे सोडून. अध्यक्षीय लोकशाही (अमेरीका),सांसदीय लोकशाही ( ब्रिटेन), दोनप्रणालीचे मध्य साधणारी (भारत).यामुळे लोंकांचा आवाज सत्ताधाऱ्यांच्या वरीष्ठ पदापर्यंत सहज पोहचतो. परिवर्तनशीलता,स्थिंतंतरे होण्यास लोकशाही उत्तम आहे. लोंकामध्ये विश्वास निर्माण करून राज्यकारभार करणे हीच प्रत्येक शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे.भारत किंवा भारतीय जनमत कसे आहे? या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर.... येथील जनता 'रामराज्य ' अपेक्षित करते हे उत्तर कोणताही भारतीय नागरिक देईल.
प्रस्थापिताची बजबजपुरी माजली तेंव्हा तेंव्हा येथे सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळते. एक प्रस्थापित दूसर्या प्रस्थापिताच्या मांडीला मांडी लावून बसतो व तिसर्याकडे हे दोघेही कुत्सीतपणे हसू लागतात. तेंव्हा मात्र कुठेतरी ठीणगीची सुरुवात झालेली असते. ठीणगी छोटी आहे की मोठी आहे असा भेद करायचा नसतो;तीचे वणव्यात रूपांतर होते. हे लक्षात घ्यायचे असते. प्रस्थापिताना हेच लक्षात येत नाही....मग ते कालचे असोत की आजचे....
जयदीप के.वरखिंडे.
.jpg)

Post a Comment
0 Comments