Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवली एमआयडीसीत पावसामुळे हाहाकार काही कंपन्यांत पाणी शिरले

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवली एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक पट्ट्यात आज पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले असून औद्योगिक पट्ट्यात काही कंपन्यात पाणी घुसल्याने उत्पादनावर परिणाम होऊन काही प्रमाणात त्यांना नुकसान सोसावे लागले आहे.
फेज दोन मधील मालवण किनारा हॉटेल ते मेट्रोपॉलिटन एक्झोकेम कंपनी पर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. निवासी भागातील वंदेमातरम् उद्यान, सर्व्हिस रोड, एम्स हॉस्पीटल रस्ता, चार बिल्डिंग परिसर इत्यादी ठिकाणी पाणी भरल्याचे दिसत आहे. याला मुख्य कारण म्हणजे केडीएमसी कडून व्यवस्थित न झालेली नाले सफाई आहे.


 नवीन बनविलेले काँक्रिट रस्ते हे उंच झाल्याने काही निवासी इमारतींच्या आवारात पाणी भरल्याचे दिसत आहे. नवीन गटारे, नाले यांची कामे काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. विको नाक्याजवळील जीएनपी गॅलरीआ कमर्शियल कॉम्प्लेक्स ते नंदी पॅलेस हॉटेल पर्यंतच्या नवीन नाल्याचे बांधकाम नुकतेच काही दिवसांपूर्वी सुरू केल्याने त्यातील खड्ड्यात पावसाळी पाणी भरले आहे. त्यामुळे आजूबाजूला चिखल झाला आहे.

कावेरी चौक जवळील नाल्याचे नवीन बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. नाले सफाईचे काम केडीएमसी कडे आहे तर नवीन नाले, गटारी बांधण्याचे काम एमआयडीसीकडे आहे. दोन्ही यंत्रणा एकमेकाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे. प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रधिनिधींचा यावर वचक नसल्याने सर्व सावळागोंधळ निर्माण झाला आहे. अजून पावसाळा बराच बाकी असल्याने पुढे आणखी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता यापुढे यावर सर्वांनीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments