Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबरनाथ पश्चिम भागात अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स आणि झेंड्यांवर अंबरनाथ नगरपरिषदेची धडक कारवाई

                  ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर

शहराच्या विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी आणि रहदारीला अडथळा ठरणार्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने अंबरनाथ पश्चिम भागात एक मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली. या धडक मोहिमेत परिसरातील अनेक अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स आणि झेंडे निष्कासित करण्यात आले आहेत.


अंबरनाथ पश्चिम येथील विमको नाका, खुटवली, भवानी चौक, शिवलिंग नगर आणि खोजगाव नाका या मुख्य व गजबजलेल्या परिसरांमध्ये ही कारवाई करण्यात आली. रस्त्यांच्या कडेला आणि चौकांमध्ये विनापरवाना लावण्यात आलेले फलक आणि झेंडे यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.सदर कारवाई अंबरनाथ नगरपरिषदेचे माननीय मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. 

या मोहिमेचे नेतृत्व अतिक्रमण प्रमुख श्री. नरेंद्र संखे यांनी केले. कारवाई दरम्यान नगरपरिषदेचे अधिकारी श्री. सचिन गायकवाड, श्री. जितेंद्र गोसावी, श्री. गावित आणि त्यांची संपूर्ण टीम घटनास्थळी उपस्थित होती.कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी या मोहिमेला चोख पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. तसेच 'एमएसएफ' (MSF) कर्मचारी आणि नगरपरिषदेच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.शहरात यापुढेही अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments