Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

फेरीवाला निर्मूलन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही


                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात तसेच प्रभाग परिसरात  रस्त्यांवर, पदापथांवरील अनधिकृत  फेरीवाल्यांमुळे तिथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होतो तसेच वाहतुकीचीही कोंडी होते. त्यामुळे  अनाधिकृत फेरीवाले हटविण्याबाबत महापौर हर्षाली  चौधरी तसेच आयुक्त अभिनव गोयल यांनी  सक्त निर्देश सर्व प्रभागाचे सहा. आयुक्त यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने  प्रभागाच्या सहा. आयुक्तांकडून अनधिकृत फेरीवाले हटाव  मोहिमेसाठी  कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे .



असे असतानाही पदपथ, रस्ते व सार्वजनिक जागांवर  सातत्याने फेरीवाले बसत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने, ना फेरीवाला क्षेत्रातील  फेरीवाला निर्मूलन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी न केल्याबाबत ग प्रभागातील कमलाकर सोनवणे आणि रवी बर्वे या  कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त यांनी निलंबनाची कारवाई केली  आहे. यापुढेही आपल्या कामात कामचुकारपणा  करणार्‍या कर्मचाऱ्यांवर अशीच  कारवाई केली जाईल अशी माहिती ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments