ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जीवन दीप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) वतीने दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांना गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि सेवाभाव जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात स्वयंसेवक कु.रश्मी हिले आणि कु.मानसी शेलवले यांनी गुरुंच्या कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली. तसेच शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविंद्र घोडविंदे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. कैलास कळकटे यांच्या प्रेरणेने पडला.
सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षेत्तर कर्मचारी, तसेच स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक कु.सिमरन शाम शेलार हिने केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा.रसिका सकपाळ यांनी केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments