Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिवसेना पाठीशी घालणार नाही.. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे


शास्त्री नगर रुग्णालय डॉक्टरांना मारहाण प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

दोषी आढळणाऱ्याविरुद्ध पक्षांतर्गत कठोर शिस्तभंगा ची कारवाई करण्यात येईल

लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिवसेना पक्ष पाठीशी घालणार नाही असे स्पष्टीकरण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांनी दिले असून शास्त्री नगर रुग्णालयात  डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर  स्पष्टीकरण दिले आहे.

याप्रकरणी  दोषी आढळणाऱ्या विरुद्ध पक्षांतर्गत कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले.

या प्रकरणाबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात.

या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी केडीएमसी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे अशी प्रतिक्रिया  खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments