Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ऑपरेशन ब्लू पॅंथर अंतर्गत आरक्षण बचाव समितीचे आमदार सुलभा गायकवाड यांना निवेदन


                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
आरक्षण बचाव समितीच्या शिष्टमंडळाने आज कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या आमदार  सुलभा गायकवाड यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन अनुसूचित जाती  आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात निवेदन सादर केले.

शिष्टमंडळाच्या वतीने प्रा.विलास शेजुळ (अध्यक्ष, आरक्षण बचाव समिती) ऑपरेशन ब्लू पॅंथर या उपक्रमांतर्गत राज्यातील एकूण २८८ विधानसभा सदस्य या लोकप्रतिनिधींना निवेदन सादर करण्यात येणार असून त्याची सुरुवात कल्याण मधून करण्यात आली. आमदारांना निवेदन देत सांगितले की, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजात जातीजातीत व समाजसमाजात तेढ निर्माण होण्याची भीती असून,संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

यावेळी समितीने आमदार सुलभा गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाकडे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी ठाम भूमिका घेऊन शासनाकडे आग्रह धरण्याची विनंती केली. या प्रसंगी आमदारांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून त्यातील मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी आरक्षण बचाव समितीचे पदाधिकारी व विविध अनुसूचित जाती समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments