ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ, प्रफुल केदारे
अंबरनाथ शहराचे माजी उपनगराध्यक्ष रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी , पप्पू दादा लोकसेवा फाउंडेशन तसेच सतिश पाटील प्रतिष्ठान च्या वतीने स्थानिक नगरसेविका स्वाती अतिश पाटील व नगरसेवक सचिन शांताराम गुंजाळ यांच्या पुढाकारातुन होतकरू नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी परिसरातील गरजवंतांना देवा भाऊंचा चष्मा वितरण, मोफत नेत्र तपासणी,मोती बिंदूची मोफत शस्त्रक्रिया नोंदणी व सुविधा शिबीराचे आयोजन आणि शालेय विदृयार्थांना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी एक हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्या़ना वह्या तर ५०० पेक्षा अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले .
"रमेश ( पप्पू) गुंजाळ यांच्यासारखा आदर्श लोकप्रतिनिधी या अंबरनाथ लाभला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची स्वप्न काही प्रमाणात का असेना मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही प्रसंगी सचिन गुंजाळ यांनी नागरिकांशी बोलताना दिली. भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, रॉयल पार्क, अंबरनाथ (पूर्व). येथे हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी भाजप कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, गटनेते / नगरसेवक अभिजीत करंजुले पाटिल, नगरसेवक विश्वजीत पाटील, नगरसेविका स्वाती पाटील, नगरसेवक सचिन गुंजाळ, नगरसेवक मनीष गुंजाळ, माजी नगरसेवक अशोक गुंजाळ, माजी नगरसेवक माजी सभापती कल्पना गुंजाळ ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पाटिल, नगरसेवक पवन वाळेकर, नगरसेवक विकास सोमेश्वर, नगरसेवक सुनील वाघे, उद्योजक किशोर सोरखोदे, माजी नगरसेवक लेलिन मुकु, अंबरनाथ उपशहर अध्यक्ष मिलिंद गाण, उपशहराध्यक्ष प्रकाश वाळुंज, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशनचे सर्व सहकारी , सतीश पाटील प्रतिष्ठानचे सर्व चे सहकारी व समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजरत्न गजभिये यांनी केले
.jpg)

Post a Comment
0 Comments