"आमच्यावरील गुन्हा खोटा’, निष्पक्ष चौकशीची प्रशासनाकडे मागणी”
समाजसेवक सुजित जाधव व संकेश शिंदे यांचा खुलासा
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण प्रतिनिधी
समाजसेवक सुजित जाधव आणि संकेश शिंदे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी नवे वळण आले असून, हा गुन्हा पूर्णपणे खोटा व बनावट असल्याचा दावा सुजित जाधव यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सुजित जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, त्यांच्या बहिणीच्या पतीसंदर्भातील काही वैयक्तिक बाबींवर स्पष्टीकरण विचारण्यासाठी संबंधित महिलेशी संवाद साधण्यात आला होता. मात्र, या घटनेनंतर संबंधित महिलेने सुजित जाधव व संकेश शिंदे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. ही तक्रार वस्तुस्थितीवर आधारित नसून, आपल्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे."आपण कोणत्याही प्रकारची मारहाण अथवा बेकायदेशीर कृत्य केलेले नाही.
या घटना प्रसंगी साक्षीदार म्हणून संबंधित महिलेचा पति तिथे उपस्थित होता.त्यानेही ह्या आरोपाचे खंडण करीत आपल्या पत्नीला कोणतीही मारहाण वगैरे झाली नसून हे आरोप खोटे असल्याच स्पष्ट केले आहे.त्यातून संबंधित महिलेच्या आरोपांबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
संपूर्ण घटनाक्रमाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. सत्य बाहेर येईल, असा आपल्याला विश्वास आहे," असे जाधव यांनी सांगितले. खोट्या तक्रारीमुळे आपली अनेक वर्षांची सामाजिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन झाली असून, स्वतःसह कुटुंबीयांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. निष्पक्ष तपासातून सत्य समोर येऊन न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांची सत्यता तपास यंत्रणेकडून होणाऱ्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.या प्रकरणामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, आता पोलिस तपासातून कोणती वस्तुस्थिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments