विजय यादव यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
पत्रकारांच्या एकजुटीवर भर
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण | वार्ताहर
कोकण विभाग पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, १४ जुलै रोजी कल्याण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हा (शहर) कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या विस्ताराबरोबरच पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या.
ही बैठक कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष रवींद्र देशमुख तसेच पालघर जिल्हाध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
ठाणे जिल्हा (शहर ) मुख्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संपादक विजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार महादेव पंजाबी यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून आनंद पद्मनाभन आणि प्रफुल केदारे, तर सहसचिव म्हणून करण शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गोपाल शर्मा यांची निवड झाली. सदस्य म्हणून मीनल पवार, हरिप्रकाश तिवारी आणि दीपक इंगळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी शहरनिहाय पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली. संदीप शेंडगे यांची कल्याण शहर अध्यक्षपदी, ज्येष्ठ पत्रकार शरद शहाणे यांची डोंबिवली शहर अध्यक्षपदी, सारिका शिंदे यांची डोंबिवली शहर महिला पत्रकार अध्यक्षा, तर विद्या कुलकर्णी यांची उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच रामचंद्र खडपे यांच्याकडे नवी मुंबई शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. 

कल्याण शहर कार्यकारिणीत संदीप शेंडगे (शहर अध्यक्ष), मच्छिंद्र कांबळे (कार्याध्यक्ष), संभाजी आत्माराम मोरे, अजय शेलार, सुधीर लवांदे आणि नारायण सुरोशे (उपाध्यक्ष), सचिन कानडे (सहखजिनदार), राहुल उघडे (सहसंघटक), जितेंद्र कानडे (सचिव), दिनेश जयस्वाल आणि तानाजी लोणे (संघटक), संजय भोराडे (सहसचिव) यांच्यासह सुभाष शेंडगे, विनोद लोखंडे, साईनाथ ठाकरे आणि भगवान सुरळके यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत बोलताना संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांनी पत्रकारांची सामाजिक जबाबदारी, संघटित शक्ती आणि पत्रकार संघटनांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या काळात पत्रकारांनी एकजुटीने काम करण्याची गरज असून पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटना नेहमीच ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष रवींद्र देशमुख आणि पालघर जिल्हाध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सांबरे यांनीही पत्रकारितेतील सध्याची आव्हाने, नव्या संधी, व्यावसायिक नैतिकता आणि संघटनात्मक बळकटी याविषयी मार्गदर्शन केले. पत्रकारांचे सामर्थ्य, परस्पर सहकार्य आणि संघटनेची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर उपस्थित पत्रकारांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या बैठकीमुळे कोकण विभाग पत्रकार संघाच्या कार्याला नवचैतन्य मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
.jpg)


















Post a Comment
0 Comments