Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी महापौर, आयुक्तांनी घेतला पर्जंन्यवृष्टीचा आढावा

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण / कुणाल म्हात्रे 

 गेले दोन दिवस कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या पर्जंन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी मुख्यालयातील इन्‍टीग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर  मधून‍ परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या सेंटर मध्ये असलेल्या थेट कॅमेरांच्या माध्यमातून परिसराची पाहणी केली व पाणी साचत असलेल्या ठिकाणी तक्रारींचे निराकारण करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. यावेळी त्यांनी पूरप्रवण क्षेत्रात तसेच पाणी साचत असलेल्या ठिकाणी  असलेले सीसी टिव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्यास संबंधित प्राधिकरणाकडून त्वरित दुरुस्त करणेबाबतचे निर्देश दिले त्याप्रमाणे कक्षात असलेल्या तक्रारींच्या नोंद वहीची समक्ष पाहणी केली. 

यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, सिस्टीम मॅनेजर प्रमोद कांबळे, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी  व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
पुढील 4 दिवस ठाणे जिल्हयात शासनाने ऑरेज अलर्ट जाहीर केला आहे. महापालिका मुख्यालयात व महापालिकेच्या सर्व प्रभागात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली असून त्यामध्ये 24X7 कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. प्राप्त होणा-या तक्रारींच्या अनुषगाने महापालिकेचा कर्मचारी वर्ग निराकरण करत आहे. प्रशासन आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. 

पावसाळी परिस्थितीत कुठलीही तक्रार असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या 0251-2211866/1800-233-0045/0251-2211373/1800-233-7383/1800-233-4392 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा* तसेच ऑरेंज अलर्ट जाहिर केल्यामुळे पुढील 4 दिवसात नागरिकांनी कामाशिवाय शक्यतोवर बाहेर पडू नये आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर ॲड.हर्षाली चौधरी व आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी केले. 

Post a Comment

0 Comments