Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एनआरसीच्या थकबाकी प्रकरणी केडीएमसी महासभेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा ठिय्या


                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत एनआरसीच्या थकबाकी प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या मांडत आंदोलन केले.
महासभेत तहकुबी बाबत विषय मांडताना ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कोट यांनी एनआरसी बाबत माहिती विचारताना प्रत्येक सभेत याबाबत माहिती मागितल्यावर प्रशासनाकडून पुढच्या महासभेत सांगत चालढकल केली जाते या विरोधात आपण सभागृहात बसून निषेध करत असल्याचे सांगितले. यावेळी ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर, नगरसेवक राहुल कोट, संकेश भोईर, नगरसेविका अपर्णा भोईर, स्वनाली केणे यांनी ठिय्या मांडला.
यावर सदस्य आणि महापौर उपमहापौरांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आयुक्त गोयल यांनी याबाबत कमिटी स्थापन केल्याचे सांगितले. या कमिटीत नगरसेवकांचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते मात्र या कमिटीत फक्त अधिकारीच का नगरसेवक का नाहीत असा प्रश्न उपस्थित करत आक्रमक झालेल्या कोट यांनी ठिय्या आंदोलन केले.

 यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सभा तशीच सुरू ठेवा म्हणताच ठाकरे गटाचे नगरसेवक संतापले. सदस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ठाकरे गटाच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रित आंदोलनात सहभाग घेतला यानंतर महापौर आणि सभागृहाने त्यांची कशीबशी समजूत काढत दोन महिन्यात माहिती देण्याचे आश्वासन देत त्यांना आंदोलन मागे घेण्यास मनविले.









 

Post a Comment

0 Comments