Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी शिक्षण विभागाची पहिली मुख्याध्यापक सभा संपन्न

नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची पहिली महत्त्वपूर्ण सभा अत्रे रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे संपन्न झाली. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी  विजय सरकटे यांच्या नियोजनात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने, प्रशासकीय दृष्ट्या व विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय या सभेत घेण्यात आले. 
सभेतील मुख्य विषय:- विद्यार्थी सुरक्षा या विषयाच्या अनुषंगाने 13 मे 2025 च्या शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले व त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनाने शाळा स्तरावर करावयाच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली.  

 पाठ्यपुस्तके वितरण आढावा व मोफत गणवेश वाटप. बोगस शाळांवर कडक कारवाई व फलक लावणे. नवीन अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण व गुणवत्ता वाढवणे. 'निपुण महाराष्ट्र' आणि दर शुक्रवारी १ तासिका वाचन उपक्रम. UDISE+, आधार व्हॅलीडेशन, अपार आयडी, सरल पोर्टल व PGI संचमान्यता. 'उल्लास पोर्टल' अंतर्गत प्रतिशाळा किमान १० असाक्षर नोंदणी. तंबाखूमुक्त शाळा.
शाळांच्या दर्शनी फलकावर यु-डायस क्रमांक लिहिणे बंधनकारक. खान अकॅडमी, परमवीर चक्र विजेते माहिती, पुस्तक विश्लेषण व विद्यांजली उपक्रम. 'एक पेड मां के नाम' उपक्रम इ या विषयांसह इतर काही महत्त्वपूर्ण विषयांबाबत सभेमध्ये सहायक कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव, डेटा एन्ट्री ऑपरेटर चंदन माने, विषयतज्ज्ञ चंद्रमणी सरदार,  राजाभाऊ शेप, गुरुनाथ इसामे,  वनिता चव्हाण आणि  विलास लिखार यांनी या विषयांवर सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
       सभेच्या शेवटच्या सत्रात शिक्षणाधिकारी विजय सरकटे व प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी सर्व विषयांची अंमलबजावणी या वर्षात उत्तम पद्धतीने करावी व मनपा क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामकाज व्हावे, या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापकांना निर्देश दिले.

Post a Comment

0 Comments