Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

टिटवाळ्यात अनाधिकृत बांधकामवर तोडक कारवाईचा बडगा

                                                                                    

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

केडीएमसी क्षेत्रातील अ प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा परिसरातील मांडा पश्चिमेतील अनाधिकृत रूम ३, अनाधिकृत ७ जोते यावर पाडकाम कारवाईचा बडगा शुक्रवारी उगारण्यात आला. टिटवाळा परिसरातील वाढत्या अनाधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी केडीएमसी प्रशासनाच्या रडारवर आलेल्या मांडा पश्चिमेतील ९० फुट रोड परिसरातील ३ अनाधिकृत रूम, ७ अनाधिकृत जोते यावर धडक तोडक कारवाई चा बडगा उगरीत शुक्रवारी हि अनाधिकृत बांधकामे भुईसपाट केली.



"अ" प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग क्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार, तसेच उपआयुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त चौधरी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाचे कर्मचारी, १ जेसीबी असा फौज फाटा होता. तसेच "अ" प्रभागातील टिटवाळा पूर्वेतील डीजी वन चौकातील २ अनधिकृत होर्डिग्ज वर कारवाई करण्यात आली. संदर्भीत अनाधिकृत होर्डिंग्ज काढण्यात आले.



Post a Comment

0 Comments